नाशिक – शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (१८ सप्टेंबर) १ हजार ५३५ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १ हजार ४९६ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ६१ हजार १२० झाली आहे. ४९ हजार ६१९ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार १३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १० हजार ३६२ जण उपचार घेत आहेत.
शुक्रवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ११५२, ग्रामीण भागातील ३२४, मालेगाव शहरातील ४५ तर जिल्ह्याबाहेरील १४ जणांचा समावेश आहे. तर, १३ मृतांमध्ये नाशिक शहरातील ९, मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ३ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४१ हजार ८८७. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार २२१२. पूर्णपणे बरे झालेले – ३५ हजार ०५. एकूण मृत्यू – ६३०. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ६ हजार २५२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८३.५७
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – १५ हजार ५५०. पूर्णपणे बरे झालेले – ११ हजार ७२६. एकूण मृत्यू – ३४५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ४७९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७५.४१
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ३३३. पूर्णपणे बरे झालेले – २ हजार ६४०. एकूण मृत्यू – १३८.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ५५५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७९.२१
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी