नाशिक – शहरासह जिल्ह्यात सोमवारी (१८ जानेवारी) १४४ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १५० एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात नाशिक शहरातील २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १३ हजार ८३० झाली आहे. १ लाख १० हजार ४९२ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत २ हजार ०३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १ हजार ३०७ जण उपचार घेत आहेत.
सोमवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ८०, ग्रामीण भागातील ५६, मालेगाव शहरातील ४ तर जिल्ह्याबाहेरील ४ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७४ हजार ७४०. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४१२. पूर्णपणे बरे झालेले – ७२ हजार ९३६. एकूण मृत्यू – १००४. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८००. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९७.५९
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३३ हजार ३१७. पूर्णपणे बरे झालेले – ३२ हजार १५०. एकूण मृत्यू – ८०१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३६६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.५०
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ६९५. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ३८३. एकूण मृत्यू – १७६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १३६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.२५