नाशिक – शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (१५ सप्टेंबर) १ हजार ४६६ जण कोरोनामुक्त झाले तर १ हजार १०७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच एकूण १८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ५५ हजार ९४० झाली आहे. ४४ हजार ६८० जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १०९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर सध्या १० हजार १६९ जण उपचार घेत आहेत.
मंगळवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ८१२, ग्रामीण भागातील २६२, मालेगाव शहरातील २० तर जिल्ह्याबाहेरील १३ जणांचा समावेश आहे. तर, १८ मृतांमध्ये नाशिक शहरातील ९, मालेगाव शहरातील ५ आणि ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३८ हजार ४०९. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार १४१. पूर्णपणे बरे झालेले – ३१ हजार ५६७. एकूण मृत्यू – ६०८. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ६ हजार २३४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८२.१९.
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – १४ हजार १०. पूर्णपणे बरे झालेले – १० हजार ४४५. एकूण मृत्यू – ३२५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार २४०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७४.५५.
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार २२६. पूर्णपणे बरे झालेले – २ हजार ४४५. एकूण मृत्यू – १३२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ६४९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७५.७९
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी