नाशिक – शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (१० सप्टेंबर) १४६५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात नाशिक शहरातील ९५० जणांचा समावेश आहे. दिवसभरात १०२९ जणांनी कोरोनावर मात केली तर २९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आता नाशिकमधील कोरोना बाधितांची संख्या ४९ हजार २०९ झाली आहे. ३८ हजार ६६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १०२० जणांचा कोरोनाने बळी गेला आहे तर ९ हजार ५२१ जण सध्या उपचार घेत आहेत.
दिवसभरातील बाधितांमध्ये नाशिक शहरातील ९५०, ग्रामीण भागातील ४६९, मालेगाव शहरातील ४४, जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. तर, २९ मृतांमध्ये नाशिक शहरातील १९, मालेगाव शहरातील २, ग्रामीण भागातील ८ जणांचा समावेश आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ७८.५८ एवढी आहे. आतापर्यंत १ लाख १९ हजार ३८२ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
नाशिक शहर
गुरुवारचे कोरोना बाधित – ९५० आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार ८७७ एकूण कोरोना रुग्ण – ३३ हजार ८४३ एकूण मृत्यू – ५७६ घरी सोडलेले रुग्ण – २७ हजार ६६० उपचार घेत असलेले रुग्ण – ५ हजार ६०७
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण असे
नाशिक शहर ५६०७
मालेगाव शहर ६१०
जिल्हा बाह्य १२
नाशिक ग्रामीण ३२९२
तालुकानिहाय संख्या अशी
नाशिक ४८६
बागलाण ३३१
चांदवड १२५
देवळा ८४
दिडोरी ९५
इगतपुरी १११
कळवण १३
मालेगाव ३२८
नांदगाव ३९१
निफाड ६९८
पेठ ८
सिन्नर ४९५
सुरगाणा ०
त्र्यंबकेश्वर ४४
येवला ८३