नाशिक – शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (१९ जानेवारी) १६२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १४० एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात नाशिक शहरात १ जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १३ हजार ९९२ झाली आहे. १ लाख १० हजार ६३२ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत २ हजार ०३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १ हजार ३२८ जण उपचार घेत आहेत.
मंगळवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १३०, ग्रामीण भागातील २८, मालेगाव शहरातील २ तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७४ हजार ८७०. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ३४८. पूर्णपणे बरे झालेले – ७३ हजार ०४६. एकूण मृत्यू – १००५. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८१९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९७.५६
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३३ हजार ३४५. पूर्णपणे बरे झालेले – ३२ हजार १७५. एकूण मृत्यू – ८०१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३६९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.४९
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ६९७. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ३८८. एकूण मृत्यू – १७६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १३३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.४२