नाशिक – शहरासह जिल्ह्यात सोमवारी (२१ सप्टेंबर) १ हजार ०६१ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १ हजार ४०० एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ६५ हजार ६३ झाली आहे. ५४ हजार ६०१ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार १९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ९ हजार २७२ जण उपचार घेत आहेत.
सोमवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ५९५, ग्रामीण भागातील ४२९, मालेगाव शहरातील २९ तर जिल्ह्याबाहेरील ८ जणांचा समावेश आहे. तर, १८ मृतांमध्ये नाशिक शहरातील ८, मालेगाव शहरातील २ आणि ग्रामीण भागातील ६, तर जिल्हा बाह्य १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४४ हजार ४०६. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार २२१२. पूर्णपणे बरे झालेले – ३८ हजार ६५८. एकूण मृत्यू – ६५०. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ५ हजार ०९८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८७.०६
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – १६ हजार ८१४. पूर्णपणे बरे झालेले – १२ हजार ९८३. एकूण मृत्यू – ३६५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ४६६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७७.२२
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ४९९. पूर्णपणे बरे झालेले – २ हजार ६९०. एकूण मृत्यू – १४८.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ६११. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७७.९९
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी