नाशिक – शहरासह जिल्ह्यात बुधवारी (२३ सप्टेंबर) १ हजार ४३६ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १ हजार ३९९ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ६७ हजार ६५३ झाली आहे. ५७ हजार ९८८ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार २२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ८ हजार ४४० जण उपचार घेत आहेत.
बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ७८६, ग्रामीण भागातील ५८२, मालेगाव शहरातील ५५ तर जिल्ह्याबाहेरील १३ जणांचा समावेश आहे. तर, २० मृतांमध्ये नाशिक शहरातील ७ आणि ग्रामीण भागातील १३ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४६ हजार ०९८. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार २२१२. पूर्णपणे बरे झालेले – ४० हजार ९९६. एकूण मृत्यू – ६६९. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार ४३३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८८.९३
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – १७ हजार ६१७. पूर्णपणे बरे झालेले – १३ हजार ८९८. एकूण मृत्यू – ३७९.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ३४०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७८.८९
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ५२५. पूर्णपणे बरे झालेले – २ हजार ८१०. एकूण मृत्यू – १५०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ५६५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७९.७२
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी