– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ७ हजार १११ पॉझिटिव्ह रुग्ण
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७९.५५ टक्के
……..
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३१ हजार १४१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ७ हजार १११ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ८९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण: नाशिक ग्रामीण
नाशिक – ३८०
चांदवड – ५०
एकूण – २ हजार २९३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७३.४५, टक्के, नाशिक शहरात ८२.३६ टक्के, मालेगाव मध्ये ७३.०६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८२.९७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ७९.५५ इतके आहे.