नाशिक – शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळेच शनिवारी (२९ ऑगस्ट) दिवसभरात तब्बल १२७४ नवे कोरोनाबाधित झाले. त्यात नाशिक शहरातील ९५८ जणांचा समावेश आहे. तर ६४१ जण कोरोनामुक्त झाले असून १७ जणांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे.
ग्रामीण भागात २७७, नाशिक शहरात ९५८, मालेगाव शहरात ३६ तर जिल्ह्याबाहेरील ३ अशा एकूण १२७४ जणांची कोरोना चाचणी शनिवारी पॉझिटिव्ह आली आहे. दर १७ मृतांमध्ये नाशिक शहरातील १३, मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ३ जणांचा समावेश आहे. शहरासह जिल्ह्यात आजवर २७ हजार ९७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण मृतांचा आकडा ८५६ झाला आहे. सध्या ६ हजार ४८६ जण उपचार घेत आहेत. आजवरच्या बाधितांची संख्या तब्बल ३५ हजार ३२० वर पोहचली आहे.
नाशिक शहरात आत्तापर्यंतचे प्रतिबंधित क्षेत्र १ हजार १८० आहे. आजवरचे कोरोना बाधितांची संख्या २४ हजार ८ झाली आहे. शहरातील एकूण मृत्यूंची संख्या ४८५ झाली आहे. आजवर १९ हजार ७०१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३ हजार ८२२ आहे.
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचा तपशील असा
नाशिक शहर ३८२२
नाशिक ग्रामीण २००५
नाशिक ३५२
बागलाण १८९
चांदवड ५९
देवळा ५८
दिंडोरी ४९
इगतपुरी ७०
कळवण १२
मालेगाव २७६
नांदगाव १६४
निफाड ३९३
पेठ ५
सिन्नर ३०३
सुरगाणा ६
त्र्यंबकेश्वर ८
येवला ६१
मालेगाव शहर ६५३
जिल्हाबाह्य ६