नाशिक – शहरासह जिल्ह्यात बुधवारी (१९ ऑगस्ट) १ हजार १९७ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. तर, दिवसभरात ८६४ नवे कोरोनाबाधित समोर आले. गेल्या २४ तासात जिल्ह्यात एकूण १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नव्याने बाधित झालेल्यांमध्ये ग्रामीण भागात २१९, नाशिक शहरात ६१०, मालेगाव शहरात ३४ तर जिल्ह्याबाहेरील एका व्यक्तीचा समावेश आहे. तर, बुधवारी मृत झालेल्यांमध्ये नाशिक शहरातील ७, मालेगाव शहरातील १, ग्रामीण भागातील सहा आणि जिल्ह्याबाहेरील एका कोरोना बाधिताचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या ७२८ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २६ हजार ७७४ एवढी झाली आहे. तर, शहरासह जिल्ह्यात आजवर २२ हजार ४३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरासह जिल्ह्यात सध्या ४ हजार ३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात नाशिक शहरामध्ये १ हजार ९५६, ग्रामीण भागात १ हजार ४११, मालेगाव शहरात ६३० तर जिल्ह्याबाहेरील ६ जणांचा समावेश आहे.
तालुकानिहाय उपचार घेणारे रुग्ण असे
नाशिक २३०
बागलाण ८८
चांदवड ४४
देवळा ७३
दिंडोरी ४१
इगतपुरी ५५
कळवण १८
मालेगाव १२८
नांदगाव १२२
निफाड ३१९
पेठ २
सिन्नर २४१
सुरगाणा १२
त्र्यंबकेश्वर २२
येवला १६