नाशिक – शहरासह जिल्ह्यात रविवारी (१३ सप्टेंबर) ११८७ नवे कोरोनाबाधित आढळून आले. ७७० जणांनी कोरोनावर मात केली तर १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रविवारच्या नवा बाधितांमध्ये नाशिक शहरातील ७४७, ग्रामीण भागातील ३९५, मालेगाव शहरातील ३४ तर जिल्ह्याबाहेरील ३४ जणांचा समावेश आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५३ हजार ५१६ एवढी झाली. आतापर्यंत ६१ हजार ६३४ जण कोरोनावर विजय मिळविला आहे. आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या १०६४ झाली आहे. सध्या १० हजार ८१८ जण उपचार घेत आहेत.
रविवारी दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये नाशिक शहरातील ५, मालेगाव शहरातील २, ग्रामीण भागातील ६ आणि जिल्ह्याबाहेरील १ जणाचा समावेश आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे नाशिकमधील प्रमाण ७७.८० टक्के एवढी आहे.
नाशिक शहर
रविवारचे कोरोनाबाधित ७४७. आतापर्यंतचे प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार ९१७. एकूण कोरोना रुग्ण – ३६ हजार ७२१. एकूण मृत्यू – ५९४. घरी सोडलेले रुग्ण – २९ हजार ८४६ उपचार घेत असलेले रुग्ण – ६ हजार २८१
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण असे
मालेगाव शहर ६३८
जिल्हा बाह्य १८
नाशिक ग्रामीण ३८८१
तालुकानिहाय संख्या अशी
नाशिक ५५५
बागलाण २९९
चांदवड १७०
देवळा ८२
दिंडोरी ९९
इगतपुरी १५७
कळवण ७०
मालेगाव ३९३
नांदगाव ४५१
निफाड ८६८
पेठ ९
सिन्नर ५६२
सुरगाणा २
त्र्यंबकेश्वर ५०
येवला ११४