नाशिक – शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (४ सप्टेंबर) १११२ नवे कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या २४ तासात १०२६ जण कोरोनामुक्त झाले तर ११ जणांचा मत्यू झाला आहे. त्यामुळे नाशिकमधील एकूण बाधितांची संख्या ४१ हजार ५६५ एवढी झाली आहे. तर, कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या ३३ हजार १६२ आणि एकूण कोरोना बळींची संख्या ९११ झाली आहे. सध्या ७ हजार ४९२ जणांवर उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी दिवसभरात पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये नाशिक शहरात ९३३, ग्रामीण भागात १६९, मालेगाव शहरात ३ तर जिल्हा बाहेरील ७ जणांचा समावेश आहे. तर, शुक्रवारच्या कोरोना बळींमध्ये नाशिक शहरातील ५ तर ग्रामीण भागातील ६ जणांचा समावेश आहे. नाशकातील बरे झालेल्यांची टक्केवारी ७९.७८ टक्के एवढी आहे. ही टक्केवारी नाशिक शहरात ८२.२७, ग्रामीण भागात ७३.६१, मालेगाव शहरात ७६.३८ तर जिल्ह्याबाहेरील कोरोनामुक्तांची टक्केवारी ८१.४० टक्के एवढी आहे. आतापर्यंत ९६ हजार १७८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
नाशिक शहर
शुक्रवारचे कोरोनाबाधित – ९३४, आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार ५४१, एकूण कोरोना रुग्ण – २८ हजार ५६१, एकूण मृत्यू – ५१४, घरी सोडलेले रुग्ण – २३ हजार ४९७, उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार ५५०
सध्या उपचार घेत अललेले रुग्ण असे
एकूण ७४९२
नाशिक शहर ४५५०
नाशिक ग्रामीण २३९९
मालेगाव शहर ५२२
जिल्हा बाह्य २१
तालुकानिहाय संख्या अशी
नाशिक ३१४
बागलाण १९१
चांदवड ७०
देवळा ८०
दिंडोरी ६०
इगतपुरी ६४
कळवण २५
मालेगाव ३०१
नांदगाव २७१
निफाड ४५८
पेठ १०
सिन्नर ४३८
सुरगाणा ४
त्र्यंबकेश्वर ३५
येवला ७८