नाशिक – शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) ४८२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १ हजार ०८० एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ८८ हजार ३७० झाली आहे. ७९ हजार ७२२ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ५७८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ७ हजार ०७० जण उपचार घेत आहेत.
शुक्रवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २८४, ग्रामीण भागातील १८६, मालेगाव शहरातील ५ तर जिल्ह्याबाहेरील ७ जणांचा समावेश आहे. तर, १४ मृतांमध्ये नाशिक शहरातील ५, मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ८ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५८ हजार ८१४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार ०६८. पूर्णपणे बरे झालेले – ५४ हजार ८२८. एकूण मृत्यू – ८३३. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार १५३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.२२
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २४ हजार ८८७. पूर्णपणे बरे झालेले – २० हजार ७८५. एकूण मृत्यू – ५४६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ५५६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८३.५२
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ०१८. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ६२०. एकूण मृत्यू – १६३.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २३५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९०.०९
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी