नाशिक – शहरासह जिल्ह्यात रविवारी (११ ऑक्टोबर) ४२९ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १ हजार ०७५ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ८५ हजार ५११ झाली आहे. ७६ हजार २४८ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ५२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ७ हजार ७४० जण उपचार घेत आहेत.
रविवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २९४, ग्रामीण भागातील ११८, मालेगाव शहरातील ७ तर जिल्ह्याबाहेरील १० जणांचा समावेश आहे. तर, १० मृतांमध्ये नाशिक शहरातील २, मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ६, तर जिल्हा बाह्य १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५७ हजार १७८. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार ५१५. पूर्णपणे बरे झालेले – ५२ हजार ७१५. एकूण मृत्यू – ८१०. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ६५३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.१९
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २३ हजार ७५६. पूर्णपणे बरे झालेले – १९ हजार ६०५. एकूण मृत्यू – ५१६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ६३५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८२.५३
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ९६७. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ४७४. एकूण मृत्यू – १६१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३३२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८७.५७
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी