नाशिक – शहरासह जिल्ह्यात शनिवारी (१० ऑक्टोबर) ७१२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १ हजार ०६१ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ८५ हजार ०८२ झाली आहे. ७५ हजार १७३ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ५१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ८ हजार ३९६ जण उपचार घेत आहेत.
शनिवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ५३०, ग्रामीण भागातील १५५, मालेगाव शहरातील १६ तर जिल्ह्याबाहेरील ११ जणांचा समावेश आहे. तर, १५ मृतांमध्ये नाशिक शहरातील १३ आणि ग्रामीण भागातील २ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५६ हजार ८८४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार ५१५. पूर्णपणे बरे झालेले – ५१ हजार ८९९. एकूण मृत्यू – ८०८. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार १७७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९१.२४
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २३ हजार ६३८. पूर्णपणे बरे झालेले – १९ हजार ३५६. एकूण मृत्यू – ५१०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ७७२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८१.८९
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ९६०. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ४६९. एकूण मृत्यू – १६०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३३१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८७.६०
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी