नाशिक – शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (२५ सप्टेंबर) १ हजार ४६८ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १ हजार ०४१ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ७० हजार २९७ झाली आहे. ६१ हजार ३३९ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार २७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ७ हजार ६८३ जण उपचार घेत आहेत.
शुक्रवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १०७५, ग्रामीण भागातील ३७५, मालेगाव शहरातील २७ तर जिल्ह्याबाहेरील ९ जणांचा समावेश आहे. तर, २६ मृतांमध्ये नाशिक शहरातील १५ आणि ग्रामीण भागातील ११ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४७ हजार ९००. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार २२१२. पूर्णपणे बरे झालेले – ४३ हजार १९०. एकूण मृत्यू – ६९४. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार ०१६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९०.१७
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – १८ हजार ३६६. पूर्णपणे बरे झालेले – १४ हजार ९२६. एकूण मृत्यू – ४०२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ०३८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८१.२७
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ५९२. पूर्णपणे बरे झालेले – २ हजार ९१४. एकूण मृत्यू – १५१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ५२७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८१.१२
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी