नाशिक – शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (१२ नोव्हेंबर) १६१ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १०४ जण कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९६ हजार ४३० झाली आहे. ९१ हजार ८४७ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ८६४ जण उपचार घेत आहेत.
गुरुवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ८७, ग्रामीण भागातील ६३, मालेगाव शहरातील ७ तर जिल्ह्याबाहेरील ४ जणांचा समावेश आहे. तर, ४ मृतांमध्ये नाशिक शहरातील २ आणि ग्रामीण भागातील २ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६३ हजार ७५३. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५५८. पूर्णपणे बरे झालेले – ६१ हजार २२२. एकूण मृत्यू – ८८१. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १६५०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.०३
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २७ हजार ७०६. पूर्णपणे बरे झालेले – २५ हजार ९९९. एकूण मृत्यू – ६२९.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ०७८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.८४
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार २१९. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ९२९. एकूण मृत्यू – १७०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १२०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.१३
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी (लवकरच)