नाशिक – गेल्या २४ तासात शहरासह जिल्ह्यामध्ये एकूण १०३९ नवे कोरोना बाधित आढळले आहेत. तर, ५४७ जण उपचार घेऊन बरे झाले असून दिवसभरात एकूण २१ जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक शहरात गुरुवारी (२७ ऑगस्ट) ८०७ जण नवे बाधित झाले आहेत. शहरात आतापर्यंत ११३६ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. गेल्या २४ तासात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत शहरातील मृत्यूंची संख्या ४७० झाली आहे. आतापर्यंत १८ हजार ६०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३२३० रुग्ण उपचार घेत आहेत. आजवरचे शहरातील कोरोना बाधित एकूण २२ हजार ३०८ झाले आहेत.
गुरुवारी दिवसभरात एकूण १०३९ नवे कोरोना बाधित झाले आहेत. त्यात ग्रामीणमधील १९४, नाशिक शहरातील ८०७, मालेगाव शहरातील ३८ जणांचा समावेश आहे. शहरासह जिल्ह्यात ८३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात नाशिक शहरातील ९, मालेगाव शहरातील १, ग्रामीण भागातील १० आणि जिल्ह्याबाहेरील १ जणाचा समावेश आहे.
शहरासह जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ३३ हजार ८८ झाली आहे. तर, २६ हजार ५९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. पूर्ण झालेल्या रुग्णांची टक्केवारी ८०.३८ एवढी आहे.
नाशिक शहरातील गुरुवारी (२७ ऑगस्ट) दिवसभरातील मृत व्यक्तींची माहिती
१) श्रमिक नगर,नाशिक येथील ५७ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.२) ओम साईराज, हनुमान चौक, महाराणा प्रताप चौक, सिडको येथील ५७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.३)महासागर सोसायटी, शिवसमर्थ नगर, नाशिक येथील ४८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.४)गांधीनगर, उपनगर येथील ८४ वर्षीय पुरुष वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.५)प्लॉट क्र १, स्वामी नारायण नगर, नवीन आडगाव नाका, पंचवटी येथील ४५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.६) साईबाबा नगर, महाकाली चौक, सिडको येथील ३७ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.७) जीवन कुंज हौसिंग सोसायटी,बापू बंगल्याजवळ, इंदिरानगर, वडाळा पाथर्डी रोड, नाशिक येथील ८५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.८) न्यू परिक्षित हॉस्पिटल, दिंडोरी रोड नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.९)ए.एम.ए. ए जी सोसायटी नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण असे
नाशिक शहर ३२३०
मालेगाव शहर ७१०
ग्रामीण १७१५
जिल्ह्याबाहेरील ३
तालुकानिहाय संख्या अशी
नाशिक २९२
बागलाण १७५
चांदवड ३८
देवळा ४३
दिंडोरी ६२
इगतपुरी १०५
कळवण ११
मालेगाव १९९
नांदगाव १५५
निफाड ३३८
पेठ २
सिन्नर २३०
सुरगाणा ०
त्र्यंबकेश्वर १४
येवला ५१