नाशिक – शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (८ ऑक्टोबर) ७३६ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १ हजार ०३८ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ८३ हजार ५७४ झाली आहे. ७३ हजार १११ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ४८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ८ हजार ९७९ जण उपचार घेत आहेत.
गुरुवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ३९४, ग्रामीण भागातील ३१४, मालेगाव शहरातील २४ तर जिल्ह्याबाहेरील ४ जणांचा समावेश आहे. तर, ८ मृतांमध्ये नाशिक शहरातील ४ आणि ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५५ हजार ९४९. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार ६७५. पूर्णपणे बरे झालेले – ५० हजार ९१८. एकूण मृत्यू – ७९२. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार २३९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९१.०१
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २३ हजार १२२. पूर्णपणे बरे झालेले – १८ हजार ४००. एकूण मृत्यू – ४९९.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार २२३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७९.५८
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ९२८. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ३६२. एकूण मृत्यू – १६०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४०६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८५.५९
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी