नाशिक – शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (९ ऑक्टोबर) ७९६ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १ हजार ००१ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ८४ हजार ३७० झाली आहे. ७४ हजार ११२ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ४९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ८ हजार ७६० जण उपचार घेत आहेत.
शुक्रवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ४०५, ग्रामीण भागातील ३६१, मालेगाव शहरातील १६ तर जिल्ह्याबाहेरील १४ जणांचा समावेश आहे. तर, १४ मृतांमध्ये नाशिक शहरातील ३, ग्रामीण भागातील ९ आणि जिल्हा बाह्य २ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५६ हजार ३५४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार ६८१. पूर्णपणे बरे झालेले – ५१ हजार ३७४. एकूण मृत्यू – ७९५. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार १८५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९१.१६
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २३ हजार ४८३. पूर्णपणे बरे झालेले – १८ हजार ८९५. एकूण मृत्यू – ५०८.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार ०८०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८०.४६
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ९४४. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ४१२. एकूण मृत्यू – १६०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३७२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८६.५१
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी