जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख १८ हजार १७५ रुग्ण कोरोनामुक्त
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १८ हजार १७५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३ हजार ०४४ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ११४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ८२, चांदवड २३, सिन्नर ६३, दिंडोरी ५३, निफाड ११८, देवळा १२, नांदगांव ९९, येवला २१, त्र्यंबकेश्वर १४, सुरगाणा ०४, पेठ ००, कळवण १६, बागलाण २८, इगतपुरी २१, मालेगांव ग्रामीण ३३ असे एकूण ५८७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार २३१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २०१ तर जिल्ह्याबाहेरील २५ असे एकूण ३ हजार ०४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख २३ हजार ३३३ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.०१ टक्के, नाशिक शहरात ९५.९६ टक्के, मालेगाव मध्ये ९२.५९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.६३ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.८२ इतके आहे.
मृत्यू
नाशिक ग्रामीण ८३६ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ४३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७७ व जिल्हा बाहेरील ५८ अशा एकूण २ हजार ११४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय
◼️१ लाख २३ हजार ३३३ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख १८ हजार १७५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३ हजार ०४४ पॉझिटिव्ह रुग्ण.
◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.८२ टक्के.
*(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)*
*पॉझिटीव्ह अपडेट्स : सकाळी ११ : ०० वाजता*