नाशिक – गेल्या दोन दिवसात शहरासह जिल्ह्यामध्ये एकूण १३५१ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर, १०८६ जण नव्याने बाधित झाले आहेत. तसेच, जिल्ह्यात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी (१५ ऑगस्ट) आणि रविवार (१६ ऑगस्ट) या दोन्ही दिवसातील नाशिकच्या कोरोना अहवालानुसार, शनिवारी ६०१ तर रविवारी ७५० जण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी नाशिक शहरात ३३८, ग्रामीण भागात १७४ तर मालेगाव शहरात ७३ जण कोरोना बाधित झाले. तर, रविवारी दिवसभरात नाशिक शहरामध्ये २७३, ग्रामीणमध्ये १८३ तर मालेगाव शहरात ४५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात नाशिक शहरातील ९ तर ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना मृत्यूंचा आकडा ६८९ झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या २४ हजार ४५७ एवढी आहे. जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ७७.४१ एवढी आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ९३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत नाशिक शहरासह जिल्ह्यात ४ हजार ८३७ जण उपचार घेत आहेत. त्यात नाशिक शहरात २ हजार ८२३, ग्रामीण भागात १ हजार ४६२, मालेगाव शहरात ५४४ तर जिल्ह्याबाहेरील ८ जणांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात उपचार घेणारे रुग्ण असे
नाशिक २८३
बागलाण ९८
चांदवड ६६
देवळा ७२
दिंडोरी ५१
इगतपुरी ५८
कळवण ४
मालेगाव १०५
नांदगाव १५३
निफाड २८५
पेठ १
सिन्नर २४६
सुरगाणा ७
त्र्यंबकेश्वर १९
येवला १४