नाशिक – जिल्ह्यात एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या तीन दिवासांपासून पेठ तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे पेठ तालुका कोरोनामुक्त झाला आहे. तर नाशिक शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (२६ नोव्हेंबर) ४९३ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ४४१ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९९ हजार ८२२ झाली आहे. ९५ हजार ३३९ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७७८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ७०५ जण उपचार घेत आहेत.
गुरुवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २८०, ग्रामीण भागातील १४१, मालेगाव शहरातील १३ तर जिल्ह्याबाहेरील ७ जणांचा समावेश आहे. तर, ५ मृतांमध्ये नाशिक शहरातील ३ आणि ग्रामीण भागातील २ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६५ हजार ९१४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५१२. पूर्णपणे बरे झालेले – ६३ हजार ५२४. एकूण मृत्यू – ९०२. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ४८८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.३७
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २८ हजार ७९९. पूर्णपणे बरे झालेले – २७ हजार ०४३. एकूण मृत्यू – ६६३.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ०९३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.९०
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार २९३. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ०२३. एकूण मृत्यू – १७१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.७१
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी (लवकरच)