नाशिक कोरोना अपडेट– ४१८ कोरोनामुक्त. २४४ नवे बाधित. ० मृत्यू
नाशिक – शहरासह जिल्ह्यात रविवारी (१ नोव्हेंबर) २४४ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ४१८ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकही कोरोनाचा बळी गेलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९३ हजार ९१५ झाली आहे. ८८ हजार ४२४ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार ८२१ जण उपचार घेत आहेत.
रविवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १५४, ग्रामीण भागातील ८४, मालेगाव शहरातील ४ तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६२ हजार १३०. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७६२. पूर्णपणे बरे झालेले – ५८ हजार ७४६. एकूण मृत्यू – ८६७. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २५१७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.५५
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २६ हजार ९१६. पूर्णपणे बरे झालेले – २५ हजार १५२. एकूण मृत्यू – ५९९.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार १६५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.४५
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार १५१. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ८६१. एकूण मृत्यू – १६६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १२४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.०१
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी