कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स रात्री ९ वाजेपर्यंत
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ३८० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १ हजार ९८३ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, मंगळवारी २२९ कोरोनामुक्त झाले तर २७१ रुग्ण वाढले आहे. घट व वाढ होत असल्यामुळे उपचार घेणा-याचा आकडा दोन हजाराच्या आसपास आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५३, चांदवड ११, सिन्नर ४८, दिंडोरी ३९, निफाड ८५, देवळा १६, नांदगांव ५६, येवला १३, त्र्यंबकेश्वर १६, सुरगाणा ०४, पेठ ००, कळवण १८, बागलाण २७, इगतपुरी १६, मालेगांव ग्रामीण ४१ असे एकूण ४४३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ३६७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १५८ तर जिल्ह्याबाहेरील १५ असे एकूण १ हजार ९८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख २० हजार ४५३ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.३४ टक्के, नाशिक शहरात ९७.०८ टक्के, मालेगाव मध्ये ९२.३९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.५४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.६५ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण ८२४ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ३५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७६ व जिल्हा बाहेरील ५५ अशा एकूण २ हजार ९० रुग्णांचा मृत्यु झाले आहे.