नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ६२३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार १६२ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, बुधवारी २४३ रुग्ण पूर्ण बरे झाले तर ४२४ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या संख्या दोन हजाराहून अधिक झाली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार ५००
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १५३
जिल्ह्याबाहेरील – ११
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकानिहाय
नाशिक – ५८
चांदवड – २०
सिन्नर – ५५
दिंडोरी – ४२
निफाड – ९७
देवळा – १५
नांदगांव – ६९
येवला – १९
त्र्यंबकेश्वर – १८
सुरगाणा – ०४
पेठ – ००,
कळवण – १७
बागलाण – २७
इगतपुरी -१७
मालेगांव ग्रामीण – ४०
ग्रामीण मध्ये ४९८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
एकूण जिल्हयात २ हजार १६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.