नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ७२८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १ हजार ५४४ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ३५७ होती. पण, शनिवारी ११ पर्यंत ही संख्या १ हजार ५४४ झाली आहे. २४ तासात यात १८७ रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून ही संख्या कमी होत होती. पण, अचानक वाढलेल्या या संख्येमुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एक व्हीडिओ क्लीप करुन जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर विविध माहिती दिली. काय बोलले जिल्हाधिकारी ……