त्र्यंबकेश्वर – नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापिपदी सारस्ते येथील ताराबाई माळेकर यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे त्र्यंबकेश्वर_हरसुल मध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे, आमदार हिरामण खोसकर,संचालक संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, बहीरू मुळाणे,रविंद्र भोये , जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर, मिथुन राऊत, हिरामण गावित, पंचायत समिती सभापती मोतीराम दिवे, समाधान बोडके, हिरामण गावित, नितीन देवरगावकर,राहुल शार्दुल,विठ्ठल आहेर, योगेश आहेर, आदी उपस्थित होते.
गुरूवारी सकाळी नाशिक येथे बाजार समितीच्या कार्यालयात उपसभापती पदासाठी ताराबाई माळेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्र्यंबकेश्वर तालुक्याला बाजार समितीच्या उपसभापतीपद माळेकर मिळाल्याने त्र्यंबक, हरसुल मध्ये दुपारी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. यावेळी माळेकर यांनी सर्व समर्थकांचे आभार मानून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्र्यंबकेश्वर येथे उपबाजार समिती सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रत्यानी जल्लोष करत गुलालाची उधळण केली.