दिंडोरी – आदिवासी ,कष्टकरी,शेतकरी जनतेच्या प्रश्नांवर लिखाण करुन सोडवणूक करणारे दिंडोरी येथील देशदूत विभागीय कार्यालयाचे प्रमुख नितीन गांगुर्डे यांना नाशिकच्या श्री कालिका देवी मंदिर संस्थानचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.
दरवर्षी कालिका देवी संस्थानच्यावतीने मुल्यांकन करुन उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दिले जातात. यंदा कालिका देवी संस्थानच्यावतीने हा पुरस्कार दिंडोरी येथील नितीन गांगुर्डे यांना जाहीर करण्यात आला आहे. नितीन गांगुर्डे यांनी दिंडोरी शहरातील व तालुक्यातील आदिवासी, कष्टकरी, शेतकरी यांच्या प्रश्नांना लेखणीतून वाचा फोडली असून त्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावाही केला आहे.दिंडोरी शहरात अरुणोदयं वाचनालय, ईशान्येंश्वर अभ्यासिका, शाळा, मंदिरे उभारणीपासून ते धामण नदी सवर्धन प्रकल्प सुरु करण्यातही त्यांचा सहभाग आहे. त्यांच्या प्रयत्नांनी विंध्यवासिनी डोंगरावर हिरवळ फुलली आहे. रणतळयाला लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातुन ५० लाख रुपये मंजूर करुन त्याचे सुशोेभिकरण करण्यातही त्यांचा वाटा आहे. सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधबा, शेपुझरी पर्यटनस्थळ करण्यातही त्यांचा खारीचा वाटा आहे. दिंडोरी नगरपंचायत कर्मचार्यांचे समावेशन, त्यांची किमान वेतन, फरक रक्कम आदी करण्यातही त्यांचा लढा सुरु आहे. माजंरपाडा प्रकल्पग्रस्ताचा प्रश्न, सिंग्राम, मेगाफाईन, राशी फटीलायझरर्स, एव्हरेस्ट कंपनी, मॅकडावेल, मस्करा कंपनीतील कामगारांचे प्रश्न, इन्डोफ्रेंंच जमिन गैरव्यवहार प्रकरण, ढकांबे टोलनाका, तळेगाव अक्राळे एमआयडीसी जमिन प्रश्न, विजयनगर, गांधीनगर, कादवा नगर येथील महसुल प्रश्न, दिंडोरी शहराच्या पाणीयोजनेसह तालुक्यातील पाणीयोजनांच्या प्रश्नावंर त्यांनी लिखाण करुन थेट जिल्हाधिकार्यांपासुन ते मंत्रालयापर्यत पाठपुरावा केलेला आहे. आरोग्य शिबिरे घेऊन सुमारे दहा हजार रुग्णांना लाभ दिलेला आहे. ते स्वत: मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर येथे विश्वस्त असुन तेथे ब्रम्हांडशास्त्र तज्ञ कॅप्टन अशोक खरात यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संस्कृतीची अध्यात्मिक मुल्ये रोवण्यातही योगदान देत आहे. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत आतापर्यत त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहे.यंदा नाशिकच्या कालिका देवी संस्थानने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार जाहीर केला आहे.