नाशिक – अंबड पोलीस ठाणे हद्दीमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग तीन मध्ये नखाते यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस टीमने कारवाईत केली. या मोहीमेत विनामास्क फिरणार्या ३२ लोकांवर दंडात्मक कारवाई करून रुपये १६ हजार दंड गोळा करण्यात आला. तसेच मनपा विभागीय अधिकारी मयूर पाटील व त्यांच्या सोबत असलेले कर्मचारी यांच्या यांच्यासह संयुक्त कारवाई मध्ये सोशल डिस्टंसिंगच्या ९ केसेस करण्यात आल्या. एकुण ४५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच बालाजी किराणा दुकान कामटवाडे हे पुढील आदेश पावेतो सील करण्यात आले आहे.
उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत
म.न.पा. पथकासोबत विनामास्क फिरणार्या १६ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे ६ आस्थापनांवर कारवाई केलेल्या असून एकूण ३८ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. एक आस्थापना सील करण्यात आले आहे. सेवन सिल्वर मॉल सौभाग्य नगर येथे ही कारवाई करण्यात आलेली आहे.
_