काठे गल्लीत ६० हजाराची घरफोडी
नाशिक : बंद घरफोडून चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिणे,संसारोपयोगी वस्तू आणि पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी असा सुमारे ६० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना काठेगल्लीत घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिमा अनंत गोकन (रा.शिवनेरी अपा.बनकर चौक) यांनी तक्रार दाखल केली आहे. गोकन कुटूंबिय दि.१३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून सोन्याचांदीचे दागिणे, एलईडी टिव्ही आणि सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची एमएच ४५ पी ६७९९ पल्सर दुचाकी चोरून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.
…..
दोन लाखाचे मंगळसुत्र खेचले
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळय़ातील सुमारे दोन लाख रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना गोविंदनगर भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली रामचंद्र ताडगे (रा.अमृतधाम) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ताडगे या सोमवारी (दि.१५) गोविंदनगर येथे गेल्या होत्या. रात्री राजमाता जिजाऊ मार्गावरील डॉ.क्षमा अघोर हॉस्पिटल समोरून त्या पायी जात असतांना ही घटना घडली. मोटारसायकलवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे दोन लाख रूपये किमतीचे व ५५ गॅम वजनाचे मंगळसुत्र ओरबाडून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक प्रविण शिंदे करीत आहेत.
….
दोघांची गळफास लावून आत्महत्या
नाशिक : शहरतील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी मंगळवारी (दि.१६) आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यात एका २४ वर्षीय तरूणाचा समावेश असून दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
वासननगर येथील महादेव मंदिर परिसरात राहणा-या रोहित मलप्पा वराळे (२४ रा.गजराजविहार रो हाऊस) या युवकाने मंगळवारी (दि.१६) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याबाबत भाऊ राहूल वराळे यांनी दिलेल्या खबरीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार हांडेकर करीत आहेत. दुसरी घटना जुने नाशिक येथील काझीगडी भागात घडली. रावसाहेब नामदेव दिवटे (४७ रा.कुंभारवाडा) यांनी मंगळवारी (दि.१६) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वाटपाडे करीत आहेत.