काठेगल्लीतून बुलेट चोरी
नाशिक : शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच असून, काठेगल्लीत घरासमोर पार्क केलेली बुलेट चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धार्थ काशिनाथ निकम (रा. वनराज कॉलनी, काठेगल्ली) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. निकम यांची बुलेट (एमएच १५, एफएच ७१६३) शुक्रवारी (दि.९) रात्री त्यांच्या बंगल्याच्या आवारात लावलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली. अधिक तपास पोलीस नाईक आहिरे करीत आहेत.
…..