नाशिक – केंद्र सरकारने अचानक १४ तारखेला कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला त्याविरोधात संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने द्वारका येथे वाणिज्य मंत्री पियुष गोयल विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी या आंदोलनात सर्वांनी आपला संताप व्यक्त केला, देशात ४०० कंटेनर कांदा सध्या निर्यातीसाठी बंदरांवर पोहचला याची कोण जबाबदारी घेणार , त्यानंतर बांगदेशासहित अनेक देशात भारताचा प्रामुख्याने महाराष्ट्राचा कांदा घेऊन हजारो ट्रक उभे आहेत. शेतकऱ्यांनी सहा आठ महिने सांभाळलेला कांदा मातीमोल भावाने विकायचा का ? ज्यात उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही म्हणून केंद्र शासनाने नौटंकी न करता निर्यातबंदी मागे घ्यावी असे आवाहन करण्यात आले. निर्यातबंदी मागे न घेतल्यास संभाजी ब्रिगेडतर्फे महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. यावेळी जिल्हा सचिव नितीन रोठे पाटील, शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ, विक्रम गायधनी,हर्षल पवार,लकी बावस्कर,आप्पा वाबळे, धोंडीराम सूर्यवंशी,दीपक भालेराव शंतनू चराटे,सनी ठाकरे,शुभम भावसार, ललित निर्भवने,राहुल जाधव पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते