कांदा उत्पादक शेतकर्याची ५८ हजार ५०० रुपयाची फसवणूक
नाशिक – कांदा उत्पादक शेतक-याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी देवळा तालुक्यातील मटाणे येथील नानाजी निंबा साबळे यांनी फिर्याद दिली असून इजियाज अन्सारी (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अन्सारी याने नानाजी साबळे यांचा विश्वास संपादन केला व त्यांच्याकडून २९ क्विंटल ४५ किलो कांदा २७ रुपये प्रतिकिलो प्रमाणे खरेदी केला. मात्र, प्रत्यक्षात २० रुपये प्रति किलोप्रमाणे कांदा विक्री करून ५८ हजार ५०० रुपये घेतले व ते पैसे फिर्यादी साबळे यांना न देता पळून गेला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…….
दुचाकी चोरीचे सत्र सुरुच, तीन ठिकाणी चोरी
नाशिक – शहरातून मोटारसायकली चोरीचे सत्र सुरूच आहे. मोटारसायकल चोरीप्रकरणी गुरुवारी विविध ठिकाणांवरून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. पहिली घटना सातपुर औद्योगीक वसाहतीत घडली. याप्रकरणी रत्ना रविदास भौमिक (रा. पाईपलाइन रोड) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रत्ना यांची त्यांची ऍक्टीव्हा क्र. (एचएच ०४ झेड ०४८३) हिंद रे क्टीफायर कंपनीच्या बाहेर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. तसेच जगतापवाडी, सातपूर येथील सोनू रामसिंग सहाने यांची मोटारसायकल क्र. (एमएच १५ एफडी ११४८) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. कथडा परिसरात घडली. याप्रकरणी अहेमद सलीम शेख (रा. उपनगर) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख यांनी त्यांची मोटारसायकल क्र. (एमएच १५ एचबी ०३७०) शिवाजी चौक, कथडा परिसरात पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल चोरून नेली.

……..
मुंबईनाका परिसरात घरफोडी, १२ हजाराचा एेवज चोरीला
नाशिक- घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व मोबाइल चोरून नेल्याचा प्रकार गुरुवारी मुंबईनाका परिसरात घडला. याप्रकरणी शेख फुजेश अश्पाक (रा. नुरजहा मंजिल) यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी अज्ञात चोरट्याने शेख यांच्या घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरात ठेवलेली १० हजार रुपयांची रोख रक्कम आणि २ हजार रुपये किंमतीचा मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाण करत साडेतेरा हजाराचा एेवज लुटला
नाशिक – संगनमत करत तीन ते चार जणांनी मोटारसायकल चालकास मारहाण करत लुटल्याची घटना बुधवारी विनयनगर परिसरात घडली. याप्रकरणी किशोर वाळू टिळे (रा. चेहडी पंपींग स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. १८) तीन ते चार अज्ञात संशयितांनी विनयनगर परिसरात फिर्यादी किशोर टिळे यांची मोटारसायकल आडवून चावी काढून घेत बळजबरी करत खिशातील पाकीट व त्यातील साडेआठ हजार रुपयांची रोकड, मोबाईल असा एकूण साडेतेरा हजार रुपयांचा माल हिसकावून घेतला. तसेच मोटारसायकलचे नुकसान करून मारहाण केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४१ हजार रुपयांची दागीने चोरून नेले
नाशिक – सोनसाखळी चोरट्यांनी घरात शिरून वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि पाटल्या जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना बुधवार (दि. १८) रोजी दुपारी उपनगर परिसरात घडली. याप्रकरणी वैशाली विलास धिवरे (रा. जय भवानी रोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार रोजी दुपारी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची आई भामीली शेजवळ (रा. जय भवानी रोड) यांच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश केला व त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची पोत व दोन पाटल्या असे एकूण ४१ हजार रुपयांची दागीने चोरून नेले.

अज्ञाताने पेटवली दुचाकी
नाशिक – अज्ञात समाज कंटकाने मोटारसायकल पेटवून दिल्याची घटना गुरुवारी (दि. १९) रात्री वडाळानाका परिसरात घडली. याप्रकरणी राजेश इंदराज पवार (महालक्ष्मी चाळ, वडाळा नाका) यांनी फिर्याद दिली आहे. पवार यांनी त्यांची मोटारसायकल क्र. (एमएच १५ जीडी ३११०) महालक्ष्मी चाळ येथे पार्क केली होती. गुरुवारी अज्ञात व्यक्तीने ही मोटारसायकल पेटवून देत नुकसान केले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल लंपास
नाशिक – फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल घेऊन तो चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार बुधवार सायंकाळी गंगापूर नाका परिसरात घडला.याप्रकरणी भारत बाजीराव (रा. जुना गंगापुर नाका) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवार सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास खडकाळी परिसरात फोन करण्याच्या बहाण्याने एका अज्ञात व्यक्तीने भारत यांच्याकडे मोबाइल मागीतला. त्यानंतर नजर चुकवून मोबाइल घेवून फरार झाला. भद्रकाली पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.