कळवण शिक्षण संस्थेशी स्व ए टी पवार कुटुंबाची बांधिलकी – आमदार नितीन पवार
…
कळवण – कळवण शिक्षण संस्थेच्या वाटचालीत स्व ए टी पवारांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे पवार कुटुंबाने नेहमीच शिक्षण संस्थेशी बांधिलकी जोपासली आहे ती यापुढे देखील जोपासली जाईल. कळवण शिक्षण संस्थेच्या भविष्यातील उपक्रमात मी नेहमीच सोबत राहील असा विश्वास देऊन संस्थेला शैक्षणिक उपक्रमासाठी माझ्या आमदार निधीतून १० लाख रुपयांचा निधी देणार असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.
कळवण शिक्षण संस्था संचालित आर के एम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन आमदार नितीन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार पवार बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड शशिकांत पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार, उद्योगपती बेबीलाल संचेती, मविप्र संचालक अशोक पवार,कळवण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ रावसाहेब शिंदे, संस्थेचे विश्वस्त व्ही के व्यवहारे, आर के महाजन, सुधाकर पगार,भूषण पगार, हेमंत बोरसे,राजेंद्र भामरे रमेश पगार आदी मान्यवर होते.
आमदार नितीन पवार यांनी पुढे सांगितले की सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात कळवण तालुक्यातील ओतूर धरण व सुरगाणा तालुक्यातील श्रीभुवन व सप्तश्रुंगी गडाच्या विकासासाठी निधी तरतूद करण्यात यश आले. सिंचन योजना मार्गी लावण्याचे स्व ए टी पवारांचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे त्यासाठी आपला शासनस्तरावर पाठपुरावा सुरु आहे.कळवण शिक्षण संस्थेच्या हितासाठी स्व ए टी पवारांनी पुढाकार घेतला. त्यामुळे मी नेहमीच शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करेल, मला जे शक्य आहे ती माझी मदत राहील त्यासबरोबर संस्थेला शासनस्तरावर येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मी वचनबध्द असल्याची ग्वाही यावेळी आमदार नितीन पवार यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड शशिकांत पवार यांनी सांगितले की स्व ए टी पवारांनी कळवण शिक्षण संस्थेला कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची परवानगी मिळवून दिली त्याप्रमाणे आमदार नितीन पवार यांनी तालुका क्रीडा संकुल आपल्या संस्थेला चालवायला दिले हे संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे सांगितले. यावेळी उद्योगपती बेबीलाल संचेती, डॉ रावसाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त करुन कळवण शिक्षण संस्थेचा मागोवा घेऊन नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमासाठी सर्वांनी संस्थेला मदत करण्याची गरज असल्याचे सांगितले.शासनाच्या कोरोना संदर्भातील कोवीड नियमांचे काटेकोरपणे पालन करुन कार्यक्रम संपन्न झाला. प्रास्तविक कळवण शिक्षण संस्थेचे विश्वस्त राजेंद्र भामरे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार पी एम महाडीक यांनी मानले.यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एस पगार, आर के एम विद्यालयाचे मुख्याध्यापक एल डी पगार,उपप्राचार्य प्रा राजेंद्र कापडे,प्रा. एस पी बागूल, उपमुख्याध्यापक एन डी देवरे ,पर्यवेक्षक जे आर जाधव, पी एम महाडीक,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.