नाशिक – कोरोना संदर्भात राज्यस्तरीय आढावा सभेमध्ये तज्ञ व्यक्तींनी आगामी काळात कोरोना संसर्गाची संभाव्य वाढ तसेच वायू प्रदूषणाचा होणारा परिणाम याबाबत उचित दक्षता घेण्याबाबत सूचित केले. या पार्श्वभूमीवर जिल्हयांत नियंत्रित होत असलेल्या संसर्गात वृध्दी होऊ नये यादृष्टीने वायू प्रदूषण करणा-या फटाक्यांवर नियंत्रण आणणे अनिवार्य झाले असल्याने, त्यादृष्टीने वायू प्रदूषण करणारे कोणतेही प्रकारचे फटाके कंटेमेंट झोन तसेच पूर्व घोषित शांतता क्षेत्रात आणि सार्वजनिक ठिकाणी वाजवण्याबाबत १० नोव्हेंबर २०२० रात्री १२ वाजेपासून पुढील आदेशा पर्यंत पूर्णत: प्रतिबंध करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती निवारण प्राधिकरण सूरज मांढरे यांनी दिली आहे.
त्याचप्रमाणे “No mask no entry” हा नियम सर्व सार्वजनिक ठिकाणी अनिवार्य करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याची बैठक ७ नोव्हेंबर २०२० रोजी covid-19 प्रतिबंधक विविध उपाय योजनांच्या नियोजनाच्या दृष्टीने प्राधिकरणाची घेण्यात आली. या बैठकीत इतर सर्व सदस्य पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उपस्थित होते. या बैठकीत कोरोना व्यवस्थापनाची सद्यस्थिती व भविष्यात करावयाचे उपयोजना या दृष्टीने सांगोपांग चर्चा करून प्राधिकरणाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.
नाशिक शहरात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४(१) (३) मनाई आदेश लागू असल्याने आठवडे बाजार ( जनावरे विक्री सह) सुरु करणे संदर्भात चर्चा करणेत आली. आठवडे बाजार जनावरे विक्री सह सुरु करणेत येत आहे. परंतु या बाजाराचे कामकाज करीत असताना कोविड १९ संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने यापूर्वी देण्यात आलेल्या सर्व सूचना जसे मास्कचा वापर, सामाजिक आंतर इत्यादी चा अवलंब करणे संबंधितांवर बंधनकारक राहील असेही ते म्हणाले.