नाशिक – सार्वजनिक वाचनालय नाशिक कार्यकारी मंडळ निवडीची सभा मंगळवारी सायं. ६.०० वा. ऑनलाईन सभा (गुगलमिट व्दारे) अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
खालीलप्रमाणे एकमताने पदाधिकारी निवडण्यात आले.
कार्याध्यक्ष – संजय करंजकर
प्रमुख सचिव – जयप्रकाश जातेगावकर
अर्थसचिव – उदयकुमार मुंगी
सहा. सचिव – प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे
ग्रंथ सचिव – देवदत्त जोशी
सांस्कृतिक कार्य सचिव – प्रा. डॉ. वेदश्री थिगळे
नाट्यगृह सचिव – अॅड. अभिजित बगदे
वस्तूसंग्रहालय सचिव – बी. जी. वाघ ( निवृत्त जिल्हा अधिकारी )
वरील निवड एकमताने करण्यात आली, सर्वश्री वसंत खैरनार, श्रीकांत बेणी, अॅड.भानुदास शौचे, डॉ.धर्माजी बोडके, गिरीश नातू, प्रा.डॉ.संगीता बाफना यासर्वांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्याचे अभिनंदन केले.