नाशिक – जागतिक महिला दिन निमित्त महिलांचे हक्क आणि स्त्री पुरुष समानता या बाबतीत जनजागृती साठी विविध स्तरावर वेळवेगळे उपक्रम राबविले जातात परंतु यंदा कोरोना ह्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक च्या वॉव समूहाने आभासी (व्हरच्युअल) संमेल्लन आयोजित केले आणि यात ५०० महिलांनी हिरारीने सहभाग नोंदविला.
याप्रसंगी सुरश्री रहाणे – संस्थापक, इयरबुक कॅनव्हास यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले “ज्या प्रमाणे बोलले जाते प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते तसे प्रत्येक यशस्वी महिले मागे देखील एक महिला असते ती इतर कोणी नसून ती स्वत: असते. महिलांमध्ये जर आत्मविशास असेल तर ते सहज यशास गवसणी घालू शकतात, महिला कुटुंबात विविध रूपामध्ये वावरत असते मुलगी, पत्नी, आई तिचे अनन्य साधारण महत्व आहे, या विविध भूमिकेत ती अप्रतिम काम करीत असते ह्यासाठी प्रत्येक स्त्रीचा सन्मान होणे आवश्यक आहे. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची उर्मी नेहमी सोबत असावी त्यामुळे स्वतःला प्रोत्साहित करण्यासाठी, आज स्वतः करिता टाळ्या वाजवा” ह्या आवाहनास दाद देत ५०० महिलांनी एकत्रित स्वतः साठी टाळ्या वाजवल्या.
या संमेलनाच्या प्रास्ताविकात वॉव समूहाच्या संस्थापक अध्यक्षा अश्विनी न्याहारकर ह्यांनी सांगितले ” वॉव – वुमन ऑफ विस्डम हा समूह महिलांना व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य मागील ५ वर्षांपासून करीत आहे, ह्या समूहा द्वारे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात येत असलेला विशेष उपक्रम महिलांची दुचाकी रॅली हि शहराची ओळख झाली आहे, महिला आतुरतेने ह्या कार्यक्रमाची वाट बघतात आणि १८ ते ८० ह्या वयोगटातील महिला ह्यात सहभाग नोंदवितात. जरी ह्या वर्षी रॅली होऊ शकत नसेल तरी उत्साहात कुठेही खंड न पडू देता यंदा ऑनलाईन महिला दिन साजरा करण्याचे ठरविले आणि रोज मुलाच्या ऑनलाईन अभ्यासवर्गाची तयारी करणारी आई आज स्वत; ऑनलाईन संमेलना साठी सज्ज झाली.
या संमेलन करीता वॉव – (वूमन ऑफ विस्डम) समूहाच्या रेखा देवरे, विद्या मुळाने, आदया टकले, मीनल विसपुते, श्रुती भुतडा, दर्शना सराफ, मनीषा आहेर, शुभांगी कोठुळे, माधुरी कोतवाल, संगीता मदन, शालिनी सुर्वे,सीमा बयनवार,वर्षा भांगळे,नमिता राजहंस शिल्पा दरगोडे, अर्चना बोथरा, , मनीषा आहेर, माधुरी कोतवाल, सुषमा जाधव, , करुणा बगाडे, शालिनी सुर्वे, मीना देवरे, रेखा म्हस्के, सुनंदा रहाणे, रितू मेहरा,मनीषा बारी ,वैशाली गुप्ता सपना बुटे, उज्ज्वला बोधले, मोनाली सूर्यवंशी, कल्पना शिंपी, आदीसह ५०० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला.