नाशिक – कोरोना काळात ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होऊ नये, यासाठी व्हीएम गॅस सर्व्हिसेसने रुग्णांना घरपोच ऑक्सिजन सिलेंडर देण्याची व्यवस्था केली आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या व्ही.एम. गॅस अँड ट्रेडिंग कंपनीने सर्वसामान्य रूग्णांना लिक्विड ऑक्सिजन पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
कंपनीने कोरोना आणि इतर दुर्धर आजाराच्या रुग्णांना लिक्विड ऑक्सिजन आणि किट घरपोच देण्यासाठी तत्पर सेवा सुरू केली आहे. अल्प दरात ही सुविधा देण्यात येत असून नाशिक शहरासह पुणे, धुळे, मुंबई, नागपूर यासारख्या मोठ्या शहरातही व्हीएम गॅस ट्रेडिंग कंपनीने लिक्विड ऑक्सिजन किट पुरवले असल्याची माहिती संचालक विजित पिल्ले व महेश पठाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कॉन्सनस्ट्रेटर मशीनपेक्षा लिक्विड ऑक्सिजन ९९.९९ टक्के शुद्ध असल्याने या ऑक्सिजन किटचा रुग्णांना फायदा होत आहे. मशिनद्वारे घेण्यात येणारा ऑक्सिजन हा कार्बन डाय ऑक्साईड मधून परावर्तीत होत असल्याने कॉन्सणस्ट्रेटरची शुद्धता केवेळ ९३ टक्के इतकीच असते. सद्यस्थितीत व्ही. एम. गॅस ट्रेडिंग कंपनीमध्ये १५०० लिटर आणि ७ हजार लीटरचे असंख्य ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध आहे.