नाशिक – नाशिक मध्ये टाटा प्रोजेक्तटसने बसवलेल्या एलईडी लाईटसमुळे वीजबिलात ६१ टक्के बचत होत असून, आतापर्यत सुमारे ९० टक्के जोडणी पूर्ण झाल्याने नागरिकांच्या लाईट संदर्भातील तक्रारीत मोठी घट झाली आहे. स्ट्रीट लाईट ही कुठल्याही शहराची पायाभूत गरज आहे. केवळ पादचाऱ्यांना त्यांची मदत होते किंवा वाहनांचे अपघात फक्त कमी होतात असे नाही. तर स्ट्रीट लाईटमुळे अंधारात होणारी गुन्हेगारी सुद्धा कमी होते. तसे बघता याचे व्यवस्थापन आणि दुरुस्ती खर्चिक बाब आहे. नाशिक स्मार्ट सिटी स्ट्रीट लाईट प्रोजेक्ट उल्लेखनीय असा खासगी -सार्वजनिक सामुदायिक प्रकल्प (पीपीपी )असून, आनंदाची बाब अशी की हा प्रोजेक्ट २०२० च्या स्मार्ट सिटी पंतप्रधान पुरस्कारासाठी नामनिर्देशित झाला आहे.
या आगळ्या वेगळ्या पीपीपी मॉडेल प्रकल्पाचा बसविण्यापासून ते दुरुस्ती देखभालीचा सर्व खर्च आतापर्यन्त टाटा प्रोजेक्ट या खासगी समूहाने उचलला आहे. टाटा प्रोजेक्ट्स लिने आत्तापर्यंत सुमारे ९० हजार जुने स्ट्रीट लाईट बदलून त्याठिकाणी नवीन एलईडी लाईट बसविले आहेत. या सर्व स्ट्रीट लाईट्सचे व्यवस्थापन पूर्णतः संगणकीकृत असून, ती राज्याच्या केंद्रीय नियंत्रण कक्षातील एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सिस्टिमद्वारे नियंत्रित केले जाते. नाशिक शहरातील सर्व स्ट्रीट लाईट्स हे ठरवून दिलेल्या वेळेनुसार आपोआप चालू आणि बंद होतात. आणि याचे व्यवस्थापन टाटा प्रोजेक्ट्स लि ही कंपनी या कंट्रोलरूम मधून करते.
एखाद्या लाईट मध्ये काही बिघाड झाल्यास तो अटोमॅटिकली डिटेक्ट होतो आणि तसा मेसेज कंपनीच्या फिल्डवरील माणसांना जातो. त्यामुळे त्वरित त्याची दुरुस्ती केली जाते. नाशिक स्ट्रीट लाईट प्रोजेक्ट हा वातावरणास अनुकूल असा प्रोजेक्ट असून, वीजबिलात सुमारे ६१ टक्के इतकी मोठी बचत केली आहे तर सुमारे ३१ दशलक्ष किलो वॉट युनिट्स ची बचत केली आहे. या बचतीमधून ५ टक्के इतकी रक्कम महानगर पालिकेला मिळणार असून, उर्वरित वाटा टाटा प्रोजेक्ट्स लि च असून, त्यातून बसविण्याचा आणि देखभालीचा खर्च भागविला जाणार आहे. त्यामुळे नाशिक महानगर पालिकेला कुठलाही अतिरिक्त खर्च न करता उलट बचतीतून महानगर पालिकेला फायदा तर होणार आहेच शिवाय देखभाल आणि दुरुस्ती चा सुद्धा खर्च वाचणार आहे.
टाटा प्रोजेक्ट्स लि हि कंपनी पुढील सात वर्ष या प्रकल्पाची सर्व काळजी घेणार आहे. त्यामुळे महानगर पालिकेला दरवर्षी सुमारे ३ कोटी रुपये फायदा होणार आहे . शिवाय नागरिकांच्या तक्रारींकरिता कंपनीने २४ तास टोल फ्री सेवा आणि मोबाईल अँपही सुरु केले आहे. नागरिकांच्या या तक्रारी सेंट्रल कंट्रोल रूम ला प्राप्त होतात आणि त्यांची लगेच सोडवणूक केली जात असल्याने, २०१८ आणि २०१९ च्या तुलनेत नागरिकांच्या तक्रारी सुमारे १० टक्के ने कमी झाल्या आहेत. सदरचा प्रकल्प २०१९ च्या एप्रिल महिन्यात सुरु करण्यात आला आणि तो जून २०२० मध्ये पूर्ण करायचा होता , मात्र कोविडचा परिणाम या कामावरही झाला तरी जून २०२० पर्यंत ५० टक्के पेक्षा जास्त जोडणी झाल्या होत्या आणि तर नोव्हे २०२० पर्यंत ९० टक्के जोडणी पूर्ण करून त्यांची देखभाल कंट्रोल रुमद्वारा सुरु झाली. त्यामुळे २०२० मध्ये महानगरपालिकेच्या वीजबिलात तब्ब्ल १० कोटी रुपयांची बचत झाली आहे