नाशिक – एनडीएसटी शिक्षक पतसंस्थेची ५८ वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी ११ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या पतसंस्थेच्या एकुण प्रगतीची माहीती कार्यवाह भाऊसाहेब शिरसाठ यांनी दिली. २०१५ मध्ये संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होऊन नविन संचालक मंडळ सत्तेवर आले .सत्तेवर आल्यास ” एकच ध्यास संस्थेचा विकास व सभासदांचे हित ” हा विचार मनात ठेवून कामकाजास सुरुवात केली . पतसंस्थेच्या खर्चात काटकसर, बचत व प्रमाणिक कारभार या त्रिसुत्रतीचा वापर करत जनरल मिटींग, गुणवंत समारंभ, स्टेशनरी, छपाई व किरकोळ खर्च इत्यादी मध्ये बचत करण्यात आली. त्यामुळे संस्थेच्या नफ्यात विक्रमी वाढ झाली.
दर वर्षी दोन कोटीने पतसंस्थेच्या नफ्यात वाढ झालेली आहे . मागील संचालक मंडळाने कोणत्याही प्रकारचा ठराव न करता संबधीत कर्मचाऱ्यांची फसवणूक करून बेकायदेशिर केलेली नियमबाह्या नोकर भरती रद्द केली. पतसंस्थेतील ९ कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे मुल्यमापन न करता बेकायदेशिरपणे एकाच वेळी दिलेल्या दोन, दोन वेतनवाढी रद्द केल्या.७ कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेचा विचार न करता दिलेल्या नियमबाह्य पदोन्नत्या रद्द केल्या. तसेच पतसंस्थेत आज पर्यंत ९ कर्मचारी सेवानिवृत्त झाले.
तरी विद्यमान संचालक मंडळाने कोणत्याही प्रकारची नोकर भरती केलेली नाही. कारण संस्थेचे कामकाज ऑनलाईन केल्यामुळे रिक्त जागा भरण्याची गरज पडली नाही. संचालक मंडळाने काम हाती घेतले त्यावेळेस दिर्घ कर्ज मर्यादा ५ लाख रुपये व आकस्मित कर्ज मर्यादा २० हजार रुपये होती. विद्यमान संचालक मंडळाने दिर्घ कर्ज मर्यादा ५ वरुन १५ लाख व आकस्मित कर्ज २० हजार वरुन ५० हजार रुपये पर्यंत वाढ केली. तसेच सभासदांचा गट विमा पूर्वी फक्त ३ लाख रुपये होता. या संचालक मंडळाने २५ लाख रुपये उतरविण्यात आलेला आहे. त्याचा लाभ डिसीपीएस व २० टक्के अनुदानास पात्र सभासदांचा सुध्दा काढून सभासंदाचे हित जोपसण्यात आले आहे. पतसंस्थेचा कर्जाचा व्याज दर पूर्वी ९ .५० टक्के होता.परंतु या संचालक मंडकाने कर्जाचा व्याजदर फक्त ७ टक्के केलेला आहे . असे अनेक सभासद हिताचे निर्णय घेण्याकरीता उपाध्यक्ष राजेद्रं सांवत ,संचालक बी.आर. पाटील, मोहन चकोर, संजय चव्हाण, संजय देसले, संजय देवरे, रामराव बनकर, जिभाऊ शिंदे, हेमंत देशमुख , अरुण पवार, दत्तात्र्य आदिक,आण्णासाहेब काटे, बाबुलाल गांगुर्डे, विजया पाटील ( देवरे ), भारती पवार इत्यादी संचालक मंडळ प्रयत्न करत आहे .