नाशिक – नाशिक एज्युकेशन सोसायटी येत्या १ एप्रिल रोजी ९९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्ताने संस्था परिवाराशी संबंधित सुहृदांशी सुसंवाद कोविडच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे ऑनलाइन स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. हा ऑनलाइन संवाद संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१ एप्रिल) रोजी सायं. ४:३० वा. संस्थेच्या श्रीमती रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम हायस्कूल, द्वारका येथून झूम मीटिंग चा माध्यमातून संपन्न होणार आहे.
तसेच सदर कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा प्रसारित करण्यात येणार आहे. त्याकरिता संस्थेच्या विविध शाळांमधील माजी विद्यार्थी, माजी शिक्षक यांनी संस्थेच्या “नाशिक एज्युकेशन सोसायटी वर्धापन दिन १ एप्रिल (https://www.facebook.com/108531554667809/posts/108538618000436/)या फेसबुक पेजला फॉलो करण्याचे आवाहन करावे.
आपण सर्वांना असे सूचित करण्यात येत आहे की, आपण वरील फेसबुक पेजला फॉलो करावे. तसेच या ऑनलाईन संवादात अवश्य सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे कार्यवाह राजेंद्र निकम यांनी केले आहे.