नाशिक – गेल्या काही दिवसांपासून उत्तम नगर, बुद्ध विहार ते ओम स्वीट पर्यंत पावसाळी ड्रेनेज लाईनचे काम चालू आहे. या कामापासून उत्तमनगर वासियांना व सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे हा त्रास होत असल्यामुळे येथील नागरिकांनी आपला संताप व्यक्त करुन रांगोळी आंदोलन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पश्चिम विधानसभा युवक कार्याध्यक्ष विशाल डोखे यांनी या आंदोलनाबाबत सांगीतले की, गेल्या एक महिन्यापासून या कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहे. दुकानदार व विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. तर दुसरीकडे हे काम करत असतांना कमी व्यासाच्या पाईपलाईनचा वापर केला जात आहे. सिडको भागात दाट वस्ती आहे. त्यामुळे याबाबतची माहिती नागरिकांना कळावी. त्याचप्रमाणे रात्री किती वाजे पर्यंत काम करण्यासाठी परवाणगी आहे हे नागरिकांना कळावे असेही त्यांनी सांगितले.
या आंदोलनात नवीन नाशिक येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुष्पाताई राठोड, मनोज हिरे, वंदना ताई पतीलब, किशोरी गायकवाड, अक्षय पाटील , कृष्णा काळे , अजय पाटील , रोहित पाटील , बाळासाहेब जमधडे , विकृत डहाळे , सुनील घुंगे , करण आरोटे यांनी सहभाग घेतला.