नाशिक – १९४८ साली स्थापन झालेल्या नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये तोफा चालविण्याचे (तोफची अर्थात गनर) प्रशिक्षण दिले जाते. भारतातील हे सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र आहे. ४२ आठवड्याच्या प्रशिक्षण कालावधीत सरासरी पाच ते सहा हजार जवान प्रशिक्षण घेतात. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २७० जवानांना गुरुवारी समारंभात गौरविण्यात आले.
आर्टिलरी सेंटरचे कमांडट ब्रिगेडियर जे. एस. गोराया यांनी यावेळी सलामी स्वीकारली. जवानांच्या धैर्याचे, एकनिष्ठतेचे त्यांनी कौतुक केले. भारतीय लष्कराच्या गौरवशाली परंपरेचा आणि व्यावसायिकतेचा पाईक होण्याची पात्रता जवानांनी अंगी बाणावी, असे आवाहन त्यांनी केले. या तुकडीतील उत्कृष्ट कामगिरी करणा-या जवानांना करंडक देऊन गौरविण्यात आले. जवान नारायण शिंदे हे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरले. त्यांना गौरव पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
त्र्यंबकेश्वरच्या पर्वतराजीतील हे नाशिकरोडचे आर्टिलरी सेंटर भारतातील सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र आहे. ४८ आठवड्यांच्या वैज्ञानिक आणि कठोर प्रशिक्षणानंतर जवानांना भारतीय लष्करात समाविष्ट केले जाते. त्यांना दृढनिष्ठ सैनिकांसारखा आकार दिला जातो. त्यांना “गनर्स” किंवा “तोपची” म्हणून ओळखले जाते. आधुनिक युद्धाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी बलाढ्य गन, रॉकेट, क्षेपणास्त्र किंवा ऑपरेटिंग रडार हाताळण्याचे प्रशिक्षण या जवानांना देण्यात आले. २७० जवानांच्या तुकडीने मे २०२० मध्ये प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण सुरू केले. या प्रशिक्षण कालावधीत एक आठवडे मूलभूत सैन्य प्रशिक्षणाचा (बीएमटी) समावेश होता. ज्यामध्ये प्रामुख्याने शारीरिक प्रशिक्षण, शस्त्रास्त्र प्रशिक्षण आणि नकाशा वाचन आदी समाविष्ट होते. बीएमटी पूर्ण झाल्यावर आणि अल्प मुदतीनंतर ब्रेक घेतल्यानंतर जवानांना अॅडव्हान्स मिलिटरी ट्रेनिंग (एएमटी) देण्यात आले.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या तुकडीने गुरुवारी पासिंग आऊट परेडमध्ये सहभाग घेतला. ४२ आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर देशाची सेवा करण्यासाठी हे जवान सज्ज झाले आहेत. त्यांचे पालक,प्रशिक्षक व मान्यवर उपस्थित होते. त्यांच्यामुळे जवानांचा उत्साह वाढला. जवांनांनी स्मार्ट मार्चिंगच्या हालचाली केल्या. ब्रिगेडियर जे.एस. गोरया यांनी परेडचा आढावा घेतला. भारतीय सैन्याच्या समृद्ध परंपरा आणि व्यावसायिकता टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी जवांना प्रेरित केले.