नाशिक : भरधाव आयशरने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात पुणा रोडवरील फेम सिग्नल भागात झाला. या विचीत्र अपघातात दुचाकीसह एका कारचे ट्रकचे मोठे नुकसान झाले असून ट्रक क्लिनर जखमी झाला आहे. याप्रकरणी आयशर चालकाविरूध्द मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोपान हनुमंत वाळके (३० रा.वाळकेवाडी,पिंपळद ता.चांदवड) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. वाळके रविवारी (दि.८) सकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवर पुणे रोडने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. फेम सिग्नल येथे पाठीमागून आलेल्या भरधाव आयशरने (एमएच १५ डीके ५९११) दुचाकीसह एका कारला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार वाळके गंभीर जखमी झाला होता. उपचारापूर्वी त्याचा मृत्यु झाला. या अपघातात अपघातग्रस्त आयशर एका कारवर आणि पुढे जाणा-या ट्रकवर आदळला असून तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहेत तर उत्तम मोंढे नामक ट्रक क्लिनरही जखमी झाला असून,त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
…..