नाशिक – पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा व्हिडीओ बनवत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शहरातील भीमनगर परिसरात घडली आहे. रात्री उशिरा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सदर तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात असून नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आहेत. यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता.
दरम्यान या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ तयार केला असून भद्रकाली पोलिसांनी त्रास दिल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख व्हिडिओत केला आहे. सदर तरुणावर अनेक गुन्हे दाखल आहेत.