नाशिक : नाशिक महानगरपालिका हद्दीतील औरंगाबाद मार्ग येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ‘छत्रपती संभाजीनगर मार्ग’ असा नामफलक लावण्यात आला आहे. औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ करा असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला देण्यात आला होता. मात्र याबाबत राज्य सरकारकडून कुठलीही कारवाई करण्यात न आल्याने सुस्त शासनकर्त्यांपर्यंत जनतेच्या भावना पोहचाव्या या करिता शहरातील नवीन आडगांव नाका येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ‘छत्रपती संभाजीनगर मार्ग’ असा नामफलक लावून अभिनव आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आंदोलनाबाबत पदाधिका-यांनी सांगितले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९८८ साली औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर ठेवत असल्याची घोषणा केली होती. औरंगाबादच्या भूमीत क्रूरकर्मा औरंगझेबने छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने पावन झालेल्या भूमीस त्यांचे नाव देण्यात यावे अशी राज्यातील जनतेची तीव्र भावना शासनकर्त्यांपर्यंत पोहचाव्या या करीता शहरातील औरंगाबाद मार्ग येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ‘छत्रपती संभाजीनगर मार्ग’ असा नामफलक लावून अभिनव आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शहराध्यक्ष अंकुश पवार, मनोज घोडके, संदीप भवर, सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, सचिन भोसले, संजय देवरे, संतोष कोरडे, विजय आहिरे, राकेश परदेशी, अमित गांगुर्डे, शाम गोहाड, अरुण दातीर, संदेश जगताप, ललित वाघ, निलेश सहाणे, सौरभ सोनवणे, सिद्धेश सानप, अभिजित गोसावी, अक्षय कोंबडे, रोहित उगावकर, धनराज रणदिवे, अजिंक्य बोडके, अमर जमधाडे, अमोल भालेराव, अभिषेक सोनार, प्रशांत बारगळ, आदित्य कुलकर्णी, भूषण सूर्यवंशी, शुभम क्षिरसागर, वर्धमान संचेती, यश कदम, अक्षय आहेर, प्रसाद जगताप यांनी सहभाग घेतला.