डॉक्टरला मारहाण
नाशिक : आजाराचे तपशील बदलून देण्यासाठी दोघांनी डॉक्टरला मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना वोक्हार्ट हॅास्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी डॉ. सुदर्शना गुणवंत पाटील (रा. तिडके कॉलनी) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून नीलेश राजू चव्हाण व लता राजू चव्हाण अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आजाराचा तपशिल बदलून देण्याची मागणी संशयितांनी डॉ. पाटील यांच्याकडे केली होती. मात्र डॉ. पाटील यांनी त्यास नकार दिल्याने संशयितांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक एस. पी. गेंगजे तपास करत आहे.
——-
दोन मोटारसायकली चोरी
नाशिक : शहरातून दोन मोटारसायकली चोरीला गेल्याप्रकरणी गुरुवारी (दि. १०) संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पहिली घटना अमृतधाम मेरी लिंक रोडवर घडली. याप्रकरणी तन्वीर रशिद शेख (रा. मुंबई नाका) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख यांनी त्यांची मोटारसायकल क्र. (एमएच १५ बीवाय ३५८१) ही अमृ तधाम लिंक रोडवरील एका कार्यालयासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल चोरून नेली. दुसरी घटना राजीव नगर परिसरात घडली. याप्रकरणी निलकंठ राम शेट्टी (रा. राजीवनगर) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निलकंठ यांनी त्यांची मोटारसायकल क्र. (एमएच १५ जीपी ३८७४) ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
———–
चाकूचा धाक दाखवून पैशासाठी तगादा
नाशिक : चाकूचा धाक दाखवून व्याजाच्या पैशासाठी तगादा लावणे व खंडणी मागणा-या दोघांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत प्रवीण निकाळे (रा. हिरावाडी रोड) यांने पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून किरण दत्तू शेळके (रा. कपालेश्वर मंदिरासमोर) व नागेश चंद्रकांत शेलार (रा. नागचौक) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १०) रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोघे संशयित फिर्यादी अनिकेतच्या घरी आले व चाकूचा धाक दाखवून व्याजाने दिलेल्या पैशाची मागणी करू लागले. तसेच शेळके गॅँगला दरमहा पाच हजार रुपये न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरिक्षक यु. आर. गवळी तपास करत आहे.
——
१ लाख ३२ हजारांचे दागीने ओरबाडले
नाशिक : लग्न समारंभागासाठी गेलेल्या महिलेल्या गळ्यातील १ लाख ३२ हजार रुपये किंमतीचे दागीने मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने ओरबाडून नेले. याप्रकरणी शोभा दत्तू कोकणे (रा. देवळाली कॅम्प) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि. ९) सायंकाळी फिर्यादी शोभा कोकणी या लग्नसमारंभासाठी सराफ लॉन्स, वडाळापाथर्डी रोडवर गेल्या होत्या. यावेळी त्यांचा नातू रस्त्यावर गेल्याने त्याला पकडण्यासाठी फिर्यादी त्याच्या मागे गेल्या. याप्रसंगी इंदिरानगरकडून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने एक मोटारसायकल आली व त्यावर पाठिमागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादीच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचा सोन्याचा पोहेहार व तीन ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असे एकूण १ लाख ३२ हजार रुपयांचे दागीने ओरबाडून नेले. याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक आर. भामरे तपास करत आहे.
———
घरफोडीत ७० हजारांची चोरीला
नाशिक : दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी महेंद्र अंबादास चव्हाणके (रा. शिवडे, ता. सिन्नर) यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने ९ ते १० डिसेंबर दरम्यान फिर्यादी चव्हाणके यांच्या विजयनगरमधील घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. व बेडरुममधील लोखंडी कपाटात ठेवलेली ७० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
——-
घराफोडीत पंधरा हजारांचे साहित्य चोरी
नाशिक : दरवाजाची कडी तोडून आतमध्ये प्रवेश करत अज्ञात चोरट्याने १५ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी किरण अशोक घाटेसाव (रा. चेतनानगर) याने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ७ ते १० डिसेंबर दरम्यान घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. व १० हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकूट, पाच हजार रुपये किम तीचा तांब्याचा हंडा, कळशी व तीन समया चोरून नेल्या. याप्रकरणी हवालदार खांडेकर तपास करत आहे.
——————–
वाईन शॉपमध्ये घुसून मारहाण
नाशिक : वाईन शॉपमध्ये बळजबरी घुसून फिर्यादीच्या डोक्यात वाईनची बाटली मारणे व धमकी देणा-याविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश संजय चौधरी (रा. लेखानगर) याने फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि. १०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कामगार नगर येथील वाईन शॉपमध्ये अज्ञात संशयिताने बळजबरी प्रवेश केला. व मुकेशच्या डोक्यात वाईनची बाटली मारली. तसेच मॅनेजर निलेश चौधरी व इतर कर्मचा-यांना शिवीगाळ करून गल्ल्यातील पाचशे रुपये काढून घेतले. या प्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक मजघर तपास करत आहे.