आजारपणास कंटाळून महिलेची आत्महत्या
नाशिक : आजारपणास कंटाळून लष्करी जवानाच्या पत्नीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आर्मी सेंटर भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार रूबी बी.देवनाथ (३७ रा.न्यु मॅप ए.व्ही.एन.क्वार्टरस आर्मी सेंटर) असे आत्महत्या करणा-या महिलेचे नाव आहे. देवनाथ या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. आजारपणास कंटाळून त्यांनी राहत्या दुमजली इमारतीवरून उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तातडीने देवळाली कॅम्प येथील मिलेटरी हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मयत घोषीत केले. अधिक तपास हवालदार मुतोंडे करीत आहेत.
…..
रक्तदाबाने कैद्याचा मृत्यु
नाशिक : रक्तदाब कमी झाल्याने कैद्याचा मृत्यु झाल्याची घटना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
वासूदेव प्रभू पाडवी (५७) असे मृत कैद्याचे नाव आहे. पाडवी नाशिकरोड कारागृहातील बंदी असून त्यास गुरूवारी (दि.१) रक्तदाबाचा त्रास झाला. अचानक रक्तदाब कमी झाल्याने जेल रूग्णालयात प्रथमोपचार करून कर्मचारी सिध्दार्थ जाधव यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.
……..