नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांचा मुलगा आकाश व मुख्याध्यापक दिलीपराव देवरे यांची कन्या जागृती यांचा विवाह मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत संपन्न झाला. तर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन ॲानलाईन पद्धतीने हजारो नेटकऱ्यांनी या विवाहास हजेरी लावत वधुवरांना आशीर्वाद दिले.
नाशिक येथील हाॅटेल एक्सप्रेस ईन येथे संपन्न झालेल्या या विवाहास पालकमंत्री छगनराव भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अभिनेता अभिजीत खांडकेकर, पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, माजी मंत्री विनायकदादा पाटील, बापु भुजबळ, आमदार हेमंत टकले, आ.दिलीप बनकर, आ.नितीन पवार, आ.सरोज आहिरे, आ.हिरामण खोसकर, आ.सीमा हिरे, आ.दिलीप बोरसे, माजी आमदार दिपीका चव्हाण, संजय चव्हाण, जयंत जाधव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डाॅ.सयाजी गायकवाड, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, एम.ई.टी.शिक्षण संस्थेच्या संचालिका डाॅ.शेफाली भुजबळ, संचालक दिलाप खैरे, मविप्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डाॅ.तुषार शेवाळे, संचालक नाना महाले, डाॅ.जयंत पवार, डाॅ.प्रशांत देवरे, शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र बापु पाटील, संदिप गुळवे, पुरुषोत्तम कडलग. यशवंत शिरसाठ, नुतन आहेर, भास्कर भगरे, डाॅ.योगेश गोसावी आदींसह मान्यवर उपस्थित होते. आकाश पगार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन साध्या पद्धतीने संपन्न झालेल्या या विवाहाप्रसंगी केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला.